जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
By admin | Published: July 19, 2015 01:46 AM2015-07-19T01:46:09+5:302015-07-19T01:46:09+5:30
रमजान ईदनिमित्त गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, भामरागड, चामोर्शी, सिरोंचा या प्रमुख शहरांमध्ये सामूहिक नमाज पढण्यात आला.
Next
रमजान ईदनिमित्त गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, अहेरी, भामरागड, चामोर्शी, सिरोंचा या प्रमुख शहरांमध्ये सामूहिक नमाज पढण्यात आला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिरखुर्मा खाण्यासाठी निमंत्रित करून रमजान ईदचा आनंद द्विगुणित करण्यात आला. रमजान ईदनिमित्त जिल्ह्यात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील इदगाह येथे सामूहिक नमाज पढााना मुस्लिम बांधव.