सीईओ गावात, ग्रामसेवक तावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:22 AM2018-02-07T01:22:08+5:302018-02-07T01:22:20+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मंगळवारी अचानक धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. अनेक ग्रामसेवक गैरहजर असल्याचे आढळून आले. संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऑनलाईन लोकमत
धानोरा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मंगळवारी अचानक धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. अनेक ग्रामसेवक गैरहजर असल्याचे आढळून आले. संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुरूमगाव, बेलगाव, खेडेगाव, देवसूर, कटेझरी या गावाांना भेटी दिल्या. तेथील सिंचन विहीर, शौचालय बांधकाम, शेततळे आदींची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता दमाय, शाखा अभियंता खोब्रागडे, पं.स. चे विस्तार अधिकारी सावसाकडे, जुआरे आदी उपस्थित होते. कटेझरी ग्रामपंचायतीला सकाळी १०.३० वाजता भेट दिली असता, ग्रामसेवक इंगळे गैरहजर होते. मागील पाच वर्षांपासून नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींची दखल घेऊन गावाला भेट का दिली नाही, असा संतप्त सवाल गावकºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांसमोर उपस्थित केला. ग्रामसेवक इंगळे हे दोन महिन्यांपूर्वी रूजू झाले. पदभार स्वीकारल्यानंतर ते आलेच नाही. यापूर्वीचे ग्रामसेवक राऊत हे सुद्धा नियमितपणे येत नव्हते, असा आरोप कटेझरी येथील ग्रामसभा पदाधिकाºयांनी केला.