भामरागड येथे काेविड सेंटरला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी टास्क फाेर्सची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये तेथील सुविधा व काही उणिवा उघडकीस आल्या. या काेराेना केअर सेंटरमध्ये सध्यस्थितीत ३६ बेड उपलब्ध आहेत; मात्र बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने ते बेड अपुरे पडत आहेत. या बाबीकडे कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे लक्ष वेधून घेतले. तत्काळ त्यांनी ही मागणी मान्य करत या काेविड सेंटरमधील बेडची संख्या लवकरच ५० करण्यात येईल, असे सीईओ आशीर्वाद यांनी सांगितले.
काेविड सेंटरमधील ज्या काही किरकाेळ स्वरुपाच्या दुरुस्त्या आहेत. त्या सर्व दुरुस्त्या लवकर हाेण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील, असे यावेळी सीईओंनी सांगितले. भामरागड तालुक्याच्या आराेग्य विभागात अतिरिक्त वाहनाची समस्या असल्याचे यावेळी निदर्शनास आले. गैरसाेय हाेऊ नये, यासाठी अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्यात यावे, याबाबत निर्देश देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे लवकरच भरण्यात येतील, तसेच भामरागड तालुक्यातील आराेग्य सेवेला प्रथम प्राधान्य देऊन कामे करावीत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आराेग्य विभागाच्या प्रमुखांना दिल्या.
भामरागड येथील बैठकीमध्ये आराेग्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे काेविड लसीकरण करण्यात यावे, या कामासाठी अतिरिक्त स्वरुपात लसीकरण केंद्राची निर्मिती करणे, सर्वांची काेविड तपासणी करणे, गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची, आराेग्यसेवक, परिचारिका व आशावर्करद्वारे तपासणी करून या कामासाठी आवश्यक असणारा सर्व पुरवठा करण्याची जबाबदारी सहायक जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. विनाेद म्हशाखेत्री यांच्याकडे साेपविण्यात आली.
यावेळी आढावा बैठकीला तहसीलदार, पं. स. चे गटविकास अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आराेग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. याप्रसंगी एडीएचओ डाॅ. विनाेद म्हशाखेत्री, नाेडल अधिकारी डाॅ. पंकज हेमके उपस्थित हाेते.
बाॅक्स ......
वसतिगृहाला दिली भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अहेरीला भेट दिली. दरम्यान, येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन त्या ठिकाणी अधिकचे बेड उपलब्ध करून औषधाेपचार पुरविता येईल काय? याबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सीईओंच्या या दाैऱ्यामुळे आराेग्य विभागाच्या कामात गतिमानता आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या कामांच्या जबाबदारीबाबत सूचना केल्या.
===Photopath===
130421\13gad_5_13042021_30.jpg
===Caption===
काेविड सेंटरमध्ये टास्क फाेर्समधील कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेताना जि. प. सीईओ कुमार आशिर्वाद.