लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.निजामाबाद-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्गा सिरोंचा तालुक्यातून जातो. सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा राज्यात कालेश्वराचे मंदिर आहे. तसेच तेलंगणाच्या वतीने मेडीगड्डा धरणाचे बांधकाम सुरू आहे. ही दोन्ही स्थळे पाहण्यासाठी अनेक नागरिक सिरोंचा तालुक्यात येतात. मात्र धर्मपुरी ते आसरअल्ली दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी व दुचाकी वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. महामार्गाच्या दुरूस्तीसाठी निवेदन देण्यात आले. मात्र मार्गाच्या दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ८ फेब्रुवारीला निवेदन देऊन १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने मार्ग दुरूस्तीबाबतची कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तुमनूर बसथांब्यावर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती.सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. चार ते पाच दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले. अधिकाºयांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात काळीपिवळी वाहनचाकल, अॅटोचालक आदी उपस्थित होते. चार ते पाच दिवसांत मार्गाची दुरूस्ती न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.आंदोलनाला नवरदेवाचाही पाठिंबासकाळी ११ वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान वाहनांची मोठी रांग लागली होती. याचवेळी एक वरात लग्न कार्यासाठी जात होती. आंदोलनाचा फटका वरातीलाही बसला. आंदोलन संपेपर्यंत वरातीला थांबावे लागले. नवरदेवाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलनाला आपलाही पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:17 PM
निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ठळक मुद्देपाच दिवसात दुरुस्तीला सुरुवात करण्याचे आश्वासन : निजामाबाद-जगदलपूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य