शहरात मालमत्ता कराचे ४ हजार ७५६ खातेदार तर पाणी कराचे १ हजार ५१६ खातेदार आहेत. मागील वर्षात कराची एकूण मागणी ६३ लाख ६९ हजार रुपये आहे. त्यात मालमत्ता कर ३ लाख ५ हजार, वृक्षकर १७ लाख ९६ हजार, शिक्षण कर १ लाख ४९ हजार, यांचा समावेश आहे. कोरोना संकट असल्याने नागरिक कर भरण्यासाठी धजावत नाही. अशाही परिस्थितीत सरासरी ४२ टक्के कर वसूल करण्यात आला. वसूल झालेल्या करात मालमत्ता कर २६ लाख ७४ हजार, वृक्षकर १ लाख २८ हजार, शिक्षण कर ६ लाख ३४ हजार, रोजगार हमी योजना कर ८० हजार ६८१ रुपये एवढी वसुली झाली आहे.
थकीत रक्कम मालमत्ता कर ३६ लाख ९५ हजार, वृक्षकर १ लाख ७७ हजार, शिक्षण कर ११ लाख ३५ हजार, रोजगार हमी योजना कर ६९ हजार रुपये एवढा आहे. कराची थकीत रक्कम असल्याने शहरातील विविध विकास कामे करताना अडचण जात आहे. नागरिकांकडून मिळालेल्या कराची रक्कम सामान्य फडात जमा केली जाऊन जमा रकमेतून वर्षभरात बांधकाम, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, विद्युत सेवा, हातपंप दुरुस्ती, कार्यालयीन आस्थापना यावर खर्च केले जातात, अशी माहिती कर निरीक्षक भारत वासेकर यांनी दिली.
शासनाकडून चौदावा व पंधरावा वित्त आयोग, दलिततेत्तर योजना, नगरोस्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना, सुवर्ण जयंती योजना, अग्निशामक योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आदी निधी नगरपंचायतीला मिळते. या निधीचा उपयोग शहराच्या विकास कामासाठी होत असल्याची माहिती लेखापाल जगदीश नक्षीने यांनी दिली. पाणीपुरवठा विभागाकडे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत कराची एकूण मागणी २४ लाख ७६ हजार २५० रूपये एवढी आहे. त्यापैकी ७ लाख १४ हजार १२० रुपये वसुली झाली आहे. सध्या १ हजार ५१६ नळ कनेक्शन धारक आहेत.