लोकमत सखी मंचतर्फे आयोजन : अपर्णा रामतीर्थकर यांचे मार्गदर्शनचामोर्शी : बदलत्या काळात माणूस नाते संबंधांपासून दुरावत आहे. परस्पर संबंधातही ताण-तणाव निर्माण झाल्याने नातीगोती यातही तेढ निर्माण होऊन कुटुंब व्यवस्था कोलमडत आहे. परस्पर नाती जपतांना कुठली काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शनासाठी ‘चला... नाती जपूया!’ या विषयावर सोलापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन चामोर्शी येथे रविवार २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता केवळरामजी हरडे बीएड् महाविद्यालयात करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच तथा चामोर्शी युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित व्याख्यानाद्वारे अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या ओजस्वी वाणीतून परस्पर नातेसंबंध व ते कसे जपावे यावर मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी त्वरा करावी, असे आवाहन सखी मंच तालुका संयोजिका चैताली चांदेकर, गटप्रमुख अॅड. प्रेमा आर्इंचवार, आरती भीमनवार, प्रीती भोगावार, स्वाती जिल्हेवार, प्राची भिवापुरे, सोनाली पालारपवार, रूपा दोशी, कांचन चकोर, संगीता करींगलवार, लीला आर्इंचवार, श्वेता पालारपवार, तारा गांधी, रोशनी वरघंटे, ज्योती ओल्लालवार, मुमताज सय्यद, काजल सोमनकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
चामोर्शीत आज ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान
By admin | Published: June 26, 2016 1:20 AM