चंद्राखडी पहाडी परिसर दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:33 PM2019-06-22T23:33:17+5:302019-06-22T23:34:14+5:30
जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी एटापल्ली तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून या तालुक्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्याची स्थापना होण्यापूर्वी १ ते १९८१ ला झाली. तालुक्याला उत्तर-दक्षिण बांडिया नदी वाहत असून या नदीच्या किनाऱ्याजवळील जमिनीला नदीच्या पाण्यापासून सिंचन करता येते.
जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी एटापल्ली तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून या तालुक्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्याची स्थापना होण्यापूर्वी १ ते १९८१ ला झाली. तालुक्याला उत्तर-दक्षिण बांडिया नदी वाहत असून या नदीच्या किनाऱ्याजवळील जमिनीला नदीच्या पाण्यापासून सिंचन करता येते. तसेच नदी सूरजागड डोंगरामधून वाहत असल्यामुळे पेट्टा या गावाजवळ निसर्गरम्य असे. पर्यटनस्थळ निर्माण झाले आहे. या सूरजागड डोंगरामध्ये लोखंडाकरिता आवश्यक असा उत्तम प्रतीचा लोहखनिज उपलब्ध असून या लोहखनिजापासून लोखंड पोलादाचे उद्योग निर्माण करण्यासाठी विविध कंपन्यांचे प्रस्ताव शासनाकडे आले आहेत. एटापल्ली तालुक्यात जानेवारी महिन्याच्या ५, ६, ७ या तीन दिवस आदिवासी बांधवांचा मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण पंचक्रोशीतील आदिवासी येथे येतात. व ते सुरजागड पहाडावर असलेल्या गावामध्ये ठाकूरदेवाची पूजा करतात. या गावातील मंदिरामध्ये घोड्यावर बसलेल्या ठाकूरदेवाच्या मूर्तीची पूजा झाल्यानंतरच यात्रेला प्रारंभ होतो. आदिवासी समाजासाठी ठाकूरदेवाची आराधना ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. यात्रेच्या दुसºया दिवशी गावातील पुजारी आणि पोलिस पाटील व महत्त्वाची मंडळी ५ किमी उंचावर सुरजागड लोह पहाडीवर ढोलताशाच्या निनादात व आदिवासी रेला नृत्यासोबत जाऊन पहाडावरील ठाकूरदेवाच्या दुसºया मूर्तीचीही पूजा करतात. या यात्रेदरम्यान आदिवासी बांधव आपल्या परंपरेनुसार कोंबड्या व बकऱ्यांचा बळीही देवाला नवस म्हणून देतात. व या भागात सुखशांती लाभू दे, अशी प्रार्थना ठाकूरदेवाकडे करतात. ठाकूरदेवाला केलेल्या या प्रार्थनेमुळे आपल्यावरची संकटं दूर होतात, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. एटापल्ली-कसनसूर मार्गावर चंद्राखंडी देवीची मूर्ती आहे. या मार्गावरून ये-जा करणाºयांना वाघ आणि सिंह अतिशय शांत मुद्रेमध्ये बसून असतात, असे जाणवते, अशी दंतकथा या भागात प्रचलित आहे. या तालुक्यासाठी चंद्राखंडी देवीची मूर्ती ही जागृत देवस्थान असल्याचे नागरिक मानतात. तोडसा येथे तीन दिवसीय दसरा उत्सव साजरा केला जातो. या परिसरातील लोकं एकत्र येऊन एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात व दसºयाचा सण साजरा करतात. एटापल्ली तालुक्यात निसर्गाने भरभरून साधन संपत्ती दिली आहे. या भागात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. परंतु अद्याप या दृष्टीने प्रयत्न झालेले नाही. सुरजागड पहाडीवर अभ्यासकांना मोठ्या प्रमाणावर अभ्यासाची संधी उपलब्ध आहे.
राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन सदर चंद्राखडी पहाडी परिसराचे सौंदर्यीकरण करून विकास केला तर येथे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.