लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेंद्रीय शेती उत्पादनाच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेला ‘गोफ्स’च्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी उत्पादनांची प्रशंसा केली.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांनी गोप्स या उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती, कार्यप्रणाली, विक्री व्यवस्थापन यांची माहिती जाणून घेतली. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सेंद्रीय पध्दतीने शेती करायला लावून त्यांच्या उत्पादनांचे ब्रॅन्ड तयार केल्यासंदर्भात समाधान व्यक्त केले. प्रक्रिया युनिट, बाजार विक्री व्यवस्थापनाकरिता मूलभूत सुविधांची उभारणी करण्याकरिता मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. सेंद्रीय शेतीचे ब्रॅन्ड जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वात आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आले . यावेळी कंपनीचे प्रवर्तक सौरभ म्हशाखेत्री, संचालक नामदेव उंदीरवाडे, तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच सद्य:स्थितीत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. रहांगडाले, आत्माच्या उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंतकुमार उंदीरवाडे उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीतील उत्पादनांची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:24 PM
कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेंद्रीय शेती उत्पादनाच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेला ‘गोफ्स’च्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी उत्पादनांची प्रशंसा केली.
ठळक मुद्दे‘गोफ्स’ची जाणली माहिती : आत्माचा उपक्रम