लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : स्थानिक नगर पंचायतींतर्गत नाली, रस्ता सफाईचे काम करणाऱ्या कामगारांच्या मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात यावी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँकेत जमा करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी चामोर्शी नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.सदर आंदोलनाची माहिती देण्यासाठी सफाई कामगार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदही घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष भशारकर, कुलदीप आत्राम, एकनाथ नवले, दिलीप म्हशाखेत्री, युवराज सयाम, नरेंद्र बन्सोड, दीपक पाटील, संतोष बन्सोड, निवृत्ती बन्सोड, पुंडलिक मुळे, चंद्रभान बन्सोड, रोशन गेडाम, केशव रामटेके, केशव ठाक, अक्षय राऊत, जीवन भलवे, नामदेव सातारे, अरूण कस्तुरे, अनिल कस्तुरे, कविता मोगरे, ब्रिजेश शेंदरे, रवी मंडरे आदींसह बहुसंख्य सफाई कामगार उपस्थित होते.नगर पंचायततर्फे शहरातील नाली सफाईचा कंत्राट कंत्राटदारांना देण्यात आला आहे. या कामावर कंत्राटदारांमार्फत एकूण ४५ सफाई कामगार नियमित ठेवण्यात आले आहेत. मात्र कंत्राटदाराकडून कामगारांना पुरेशा प्रमाणात साहित्य दिले जात नाही. हँडक्लोज, जोडेसुद्धा पुरविण्यात आले नाही, असा आरोप मजुरांनी केला आहे. सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
सफाई कामगार कामबंद आंदोलनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:27 AM
स्थानिक नगर पंचायतींतर्गत नाली, रस्ता सफाईचे काम करणाऱ्या कामगारांच्या मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात यावी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँकेत जमा करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी चामोर्शी नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
ठळक मुद्देन्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : चामोर्शी शहरात स्वच्छतेचे काम प्रभावित