सहसंचालकांनी घेतला समस्यांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:47+5:302021-07-10T04:25:47+5:30
गडचिराेली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डाॅ. संजय ठाकरे ...
गडचिराेली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डाॅ. संजय ठाकरे यांनी ७ जुलै राेजी बुधवारी येथील गाेंडवाना विद्यापीठात विविध समस्यांचा आढावा घेतला व विविध प्रशासकीय प्रश्न जाणून घेतले.
मंत्री उदय सामंत यांनी गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यादरम्यान गाेंडवाना विद्यापीठात महाविद्यालय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रश्न व शैक्षणिक कामे करून घेण्याकरिता नागपूर विभागाचे सहसंचालक हे प्रत्येक महिन्यात गडचिराेली येथील गाेंडवाना विद्यापीठात दाेन दिवस उपस्थित राहून गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाशी संबंधित विविध प्रश्न व कामे मार्गी लावतील, असे निर्देश दिले हाेते. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक संजय ठाकरे व इतर चार अधिकारी बुधवारी गाेंडवाना विद्यापीठात दाखल झाले.
सकाळी ११ वाजतापासून दिवसभर उपस्थित राहून प्राप्त प्रस्तावावर आवश्यक ती कार्यवाही केली. अशाच पद्धतीने प्रत्येक पंधरवाड्यात कॅम्पचे आयाेजन गाेंडवाना विद्यापीठात करण्यात येणार आहे.
प्राध्यापकवृंद व इतर कर्मचाऱ्यांना नागपूर येथे न जाता गडचिराेलीमध्येच सुविधा प्राप्त हाेत आहे. यापुढे हाेणाऱ्या कॅम्पचा सर्व महाविद्यालयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे यांनी केले. मंत्री सामंत यांनी गडचिराेली येथे ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विविध प्राचार्य संघटना, कर्मचारी संघटना व प्राध्यापकांनी काैतुक केले असून दिलासा मिळाला आहे.