उन्हाळी धान खरेदीकरिता पिकांचा सात-बारा जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:47+5:302021-04-14T04:33:47+5:30
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, गडचिरोली यांच्या सूचनेनुसार रब्बी पणन हंगाम २०२०-२१ चा कालावधी हा १ मे २०२१ ते ३० जून ...
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, गडचिरोली यांच्या सूचनेनुसार रब्बी पणन हंगाम २०२०-२१ चा कालावधी हा १ मे २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत राहणार आहे. या हंगामातील उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता, शेतकरी नोंदणी अर्ज भरून सोबत सात-बारा मूळ प्रत (उन्हाळी धान उल्लेख असलेला, नमुना आठ, बँकेचे पासबुक झेराॅक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२१ पर्यंत देसाईगंज केंद्राच्या शेतकऱ्यांनी देसाईगंज खरेदी-विक्री कार्यालय येथे, तर कोरेगाव केंद्राच्या शेतकऱ्यांनी कुर्झेकर गोडावून, कोरेगाव येथे १६ एप्रिल २०२१ पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत सकाळी १० ते ५ यावेळेत जमा करावे. ३० एप्रिल २०२१ नंतर सात-बारा स्वीकारला जाणार नाही, असे देसाईगंज खरेदी-विक्री संस्थेने कळविले आहे.