गडचिरोली-चामोर्शी महामार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:42+5:302021-05-25T04:40:42+5:30
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने करण्यात येऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश ...
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने करण्यात येऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सदस्य विजय कोमेरवार यांनी केली आहे.
गडचिरोली - चामोर्शी -आष्टी -अहेरी या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. गडचिरोली ते चामोर्शीपर्यंत बांधकामात सुधारणा झालेली आहे. परंतु चामोर्शी शहरातील खोदकाम करून बांधकाम एजन्सीने जागोजागी खड्डे करून ठेवलेले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांची रहदारीसाठी अडचण होत आहे. गावातील रुग्णांचे रोडवरून जाणे कठीण झाले आहे. चामोर्शी आधीचा रस्ता बांधकाम करत असताना दररोज खड्डे विरहित करण्यासाठी मशीन वापरून समतल करण्यात येत होता; परंतु चामोर्शी गावातच ही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे रहदारीसाठी अडचण येत आहे. त्यामुळे या बाबीकडे लक्ष देऊन संबंधित कंत्राटदाराला तंबी द्यावी, अन्यथा पावसाळ्यात मुख्य बसस्थानक मार्गावर डबके तयार होऊन वाहतुकीला बाधा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.