संगणक लॅब पडल्या ओस, शिक्षण झाले दुर्लभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:40 AM2021-09-25T04:40:19+5:302021-09-25T04:40:19+5:30
राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना ...
राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना मानधनावर नियुक्त करण्यात आले. मुलांना संगणक हाताळायला मिळत असल्याने त्यांनाही शिक्षणाची गोडी लागलेली होती .त्यानंतर मात्र संगणक शिक्षकांचे मानधन बंद झाल्याने त्यांनी शाळेला पाठ दाखविली. मुलांना संगणकाचे शिक्षण देणे बंद पडले. त्यानंतर बऱ्याच शाळांतील संगणक लॅब कुणी उघडूनही पाहिल्या नाहीत. परिणामी सर्व संगणक धूळ खात पडलेले आहेत.
या योजनेमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च झाले. त्यातील बरेच संगणक खराब झाले आहेत. त्यामुळे संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळणे गरजेचे असताना शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बऱ्याच शाळांत पाहायला मिळत आहे.