बौद्ध समाजबांधवांनी एकसंघ राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:11 PM2018-10-22T23:11:15+5:302018-10-22T23:11:30+5:30
बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
येथील इंदिरा नगर परिसरातील नियोजित धम्म दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश बद्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून गौतम मेश्राम, प्रा.नीरज खोब्रागडे, प्रा.विजय खोंडे, प्रा.डॉ.जगदीश राठोड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हावा व संघर्ष करा, या मूलमंत्रानुसार बौद्ध समाजबांधवांनी आचरण ठेवायला हवे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, शुद्ध आचरण ठेवून आनंदीमय जीवन जगा, असे पालकमंत्री यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणासाठी अनेक योजनेचा लाभ घेऊन विकास करावा. अहेरीच्या इंदिरानगर येथील नियोजित जागेवर बुद्ध विहाराचे बांधकाम व इतर कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी गौतम मेश्राम, जगदीश बद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समाज मंडळाचे सहसचिव सुरेश अलोणे, संचालन आनंद अलोणे यांनी केले तर आभार किशोर शंभरकर यांनी मानले.