काँग्रेस-राकाँकडून विजयाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:21 AM2018-12-12T00:21:48+5:302018-12-12T00:22:21+5:30
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. सदर तीनही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. सदर तीनही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. फटाके फोडून व मिठाई वाटून या विजयाचा जल्लोष काँग्रेस, युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी करण्यात आला.
गडचिरोली - जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा जल्लोष फटाके फोडून मंगळवारी साजरा करण्यात आला. सदर विजय हा काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मोठी चपराक आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंकज गुड्डेवार, हसनअली गिलानी, समशेर खॉ पठाण, अमोल भडांगे, जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, रवींद्र शाहा, राजू जिवानी, श्रीनिवास दुलमवार, प्रल्हाद कऱ्हाडे, प्रभाकर तुलावी, मुस्ताक हकीम, नंदू खानदेशकर, उमेश पेटूकर, रेमजी भैसारे, वसंत राऊत, दिवाकर मिसार, ढिवरू बारसागडे, मिलींद किरंगे, तौफिक शेख, गौरव अलाम, राकेश गणवीर यांच्यासह युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आष्टी - आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय पंदीलवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नाना पसपूलवार, आनंद कांबळे, ग्राम पंचायत सदस्य शंकर मारशेट्टीवार, प्रफुल पंदीलवार, सुशील अवसरमोल, नितेश अमलपुलीवार, रमेश जुनारकर, रमेश सोमनकर, आनंद दुर्गे, बंडू चापले, राहुल डांगे, मेश्राम, कटरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिरोंचा - येथील बसस्थानक चौक, एकता चौक, मानेवर वॉर्ड आणि कोत्तागुडम येथे फटाके फोडून तसेच स्थानिक बसस्थानक चौकात मिठाई वाटप करून काँग्रेसतर्फे तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे युवा नेता आकाश परसा, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कौसर खान, अहेरी विधानसभा सचिव लक्ष्मण मेकला, नगरसेवक बबलू पाशा, मंगेश जाधव, राकेश गडपेलीवर, माजित अली, नागेश काळकोटा यांच्यासह काँग्रेस युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलचेरा - येथील नेताजी चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा केला. याशिवाय जिल्ह्याच्या अन्य शहरी व ग्रामीण भागात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.