संविधानाची अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:53 PM2018-12-12T23:53:33+5:302018-12-12T23:54:48+5:30

सर्व नागरिकांचे कल्याण व प्रगती साधणारा भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले.

The Constitution should be implemented | संविधानाची अंमलबजावणी व्हावी

संविधानाची अंमलबजावणी व्हावी

Next
ठळक मुद्देई.झेड. खोब्रागडे : संविधान महापरीक्षेतील विजेत्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्व नागरिकांचे कल्याण व प्रगती साधणारा भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी (दि.८) येथील कात्रटवार सभागृहात संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संविधान महापरीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.पी.शेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी समाजाचे अ‍ॅड.सत्यवान गुरनुले, पत्रकार रोहिदास राऊत, बौद्ध महासभेचे पदाधिकारी रवी भगत, दीपक निरंजने, दिगांबर गोंडाने आदी उपस्थित होते.
संविधानाच्या प्रस्ताविकेतील नीतीतत्त्वे अत्यंत आदर्श व मानव जातीला उपकारक अशी आहेत. या प्रास्ताविकेचे वाचन आज संपूर्ण देशभरात होत आहे. संविधानिक, नैतिकता निर्मितीसाठी वाचन महत्त्वपूर्ण ठरते, असे खोब्रागडे यांनी सांगितले. याप्रसंगी रोहिदास राऊत, अ‍ॅड.गुरनुले, सी.पी.शेंडे यांनीही मार्गदर्शन केले. संविधान महापरीक्षेतील विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके तसेच रोख बक्षीसाने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक तुलाराम राऊत, संचालन प्रा.गौतम डांगे यांनी तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले.

Web Title: The Constitution should be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.