कोरोनामुक्त 122 जणांना रूग्णालयातून सुटी, तर 116 नवीन बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 06:15 PM2020-10-11T18:15:56+5:302020-10-11T18:18:24+5:30
आतापर्यंत जिल्हयात एकुण 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
गडचिरोली : एकीकडे जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रूग्णांची संख्याही वाढत आहे.रविवारी पुन्हा 122 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच गडचिरोली शहरातील नवीन 41 कोरोना बाधितांसह जिल्हयात 116 नवीन रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित 3968 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2962 वर पोहोचली आहे. सद्या 975 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत जिल्हयात एकुण 32 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.65, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 24.55 तर मृत्यू दर 0.81 झाला. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 16, आरमोरी 4, भामरागड 6, चामोर्शी 0, धानोरा 11, एटापल्ली 19, मुलचेरा 0, सिरोंचा 8, कोरची 1, कुरखेडा व वडसा मधील 15 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 19, आरमोरी 19, भामरागड 3, चामोर्शी 5, धानोरा 11, एटापल्ली 8, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली 41 मध्ये आशिर्वादनगर 1, गांधी वार्ड 3, उराडी 1, आनंदनगर 1, बट्टूवार कॉम्प्लेक्स 1, चनकाई नगर 1, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, सीआरपीएफ 3, फुलेवार्ड 1, गोकूळनगर 1, गोविंदपूर 2, हनुमान वार्ड 1, इंदिरानगर 1, आयटीआय चौक 1, कन्नमवार वार्ड 1, कारगिल चौक 1, मासली 1, नवेगाव कॉम्प्लेक्स 1, पोस्ट ऑफिस जवळ 2, पोटेगाव 1, रेव्हून्यू कॉलनी 1, सर्वोदया वार्ड 1, स्नेहनगर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, आयोध्यानगर 1, झांशी राणी नगर 4, शहरातील इतर 1 व इतर जिल्हयातील 5 जणांचा समावेश आहे.
इतर तालुक्यांमध्ये अहेरी 19 मध्ये चिंचगवळी 2, आलापल्ली 4 व शहरातील इतर सर्व, आरामोरी 19 मध्ये इती जिल्हयातील 1 व इतर सर्व शहरातील, भामरागड 3 मधील सर्व शहरातील आहेत. चामोर्शी 5 मध्ये पेटाल्ला 1, फोकोर्डी 1 व घोट मधील 3 जणांचा समावेश आहे. धानोरा 11 मध्ये शहर 1, चातगाव पोलीस स्टेशन 1 व कारवाफा पोलीस स्टेशनचे 9 जण आहेत. एटापल्ली 8 मध्ये कसनसूर हेडरी सीआरपीएफ 4, शहरातील 3 व घोट येथील 1 चा समावेश आहे. कुरखेडा 2 मध्ये पुराडा 1 व शहरातील 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा मधील 1 जण स्थानिक आहे. वडसा येथील 7 मध्ये आमगाव 1, बोद्धा 1, गांधीवार्ड 1, शिवराजपूर 1, तुकूमवार्ड 1 व इतर 2 यांचा समावेश आहे.