महामार्गावर वेग वाढविल्याची किमत चार लाख रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:41 AM2021-09-12T04:41:44+5:302021-09-12T04:41:44+5:30
अपघातांवर नियंत्रण राहावे म्हणून प्रत्येक वाहनाला वेगमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. जेवढा वेग अधिक तेवढीच अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे ...
अपघातांवर नियंत्रण राहावे म्हणून प्रत्येक वाहनाला वेगमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. जेवढा वेग अधिक तेवढीच अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने कमी वेगात वाहन चालविणेच कधीही चांगले. तरीही काही वाहनधारक वेग मर्यादेचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येते. वाहनाची गती माेजण्यासाठी गडचिराेली शहर वाहतूक शाखेकडे स्वतंत्र मशीन आहे. ही मशीन वाहनाची गती माेजते. गतीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर चालानची कारवाई केली जाते. यात गती माेजतेवळीच मशीन वाहन क्रमांकही नाेट करते. व संबंधित वाहनधारकाच्या माेबाईलवर चालानचा संदेश पाठविला जाते. गडचिराेली शहर वाहतूक पाेलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत ३०३ वाहनांवर कारवाई करून ३ लाख ३ हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
बाॅक्स
अशी आहे वेगमर्यादा
वाहतूक विभागाने महामार्गावर दुचाकीसाठी ६० किमी प्रतीतास, कारसाठी ९० किमी प्रतीतास, तर जड वाहनासाठी ७० किमी प्रतीतास ही मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. या मर्यादेतच वाहन चालविणे अपेक्षित आहे. अन्यथा कारवाई हाेऊ शकते.
एसएमएसवर मिळते पावती
महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून दंड वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे मशीनने वाहनाची गती माेजली जाते. कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेची पावती नाेंदणीकृत माेबाईलवर एसएमएसव्दारे पाठविण्यात येते.