७३ कोटी ९७ लाखांचे पीक कर्ज

By admin | Published: July 27, 2014 11:45 PM2014-07-27T23:45:55+5:302014-07-27T23:45:55+5:30

अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे शासनाने निर्देश दिले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप हंगामासाठी १ कोटी ८० लाख रूपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

Crop loan of 73 crores 9 lacs | ७३ कोटी ९७ लाखांचे पीक कर्ज

७३ कोटी ९७ लाखांचे पीक कर्ज

Next

गडचिरोली : अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे शासनाने निर्देश दिले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप हंगामासाठी १ कोटी ८० लाख रूपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी १९ जुलैपर्यंत तब्बल ७३ कोटी ९७ लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील एकूण १९ हजार ८०० शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांनी १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचे पीक कर्ज वितरीत केले होते. मात्र गतवर्षी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्पादन झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. पीक कर्ज वसुलीचे प्रमाण कमी असल्याने बँकाही अडचणीत सापडल्या होत्या. यामुळे शेतकरी गतवर्षीच्या पीक कर्जाच्या रकमेची परतफेड केली नसेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येणार नाही, असे धोरण स्विकारले होते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १०९ कोटी ८० लाख रूपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये बँक आॅफ इंडिया १,५९० लाख, बँक आॅफ महाराष्ट्र १,५८८ लाख, कॅनरा बँक ८५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९० लाख, आयडीबीआय बँक १७० लाख, स्टेट बँक आॅफ इंडिया १,५८५ लाख, युनियन बँक आॅफ इंडिया १६५ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १,२६५ लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ४,४४२ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँक आॅफ इंडियाच्यावतीने १ हजार ८७१ शेतकऱ्यांना ८९७ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने २ हजार १६४ शेतकऱ्यांना १ हजार १४ लाख रूपयाचे पीक कर्ज वितरीत केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ५९ टक्के आहे. कॅनरा बँकेने १५ शेतकऱ्यांना १६ लाख रूपयाचे कर्ज वितरीत केले आहे. या बँकेची कर्ज वितरणाची टक्केवारी १६ टक्के आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेकडून २० शेतकऱ्यांनी १४ लाख रूपयांचे कर्ज घेतले आहे. या बँकेची कर्ज वितरणाची टक्केवारी १३ टक्के आहे. आयडीबीआय बँकेने १५२ शेतकऱ्यांना ५३ लाख रूपयांच्या पीक कर्जाचे वितरण केले आहे. या बँकेच्या पीक कर्जाच्या वितरणाची टक्केवारी २७ टक्के आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने ४५० शेतकऱ्यांना ३३८ लाख रूपयांच्या पीक कर्जाचे वितरण केले आहे. या बँकेच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी २० टक्के आहे. युनियन बँक आॅफ इंडियाने ६३ शेतकऱ्यांना २४ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. या बँकेच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी १२ टक्के आहे.
वैनगंगा कोकण ग्रामीण बँकेने १ हजार ८५६ शेतकऱ्यांना १ हजार ८ लाख रूपयाचे पीक कर्ज वितरीत केले आहे. पीक कर्जाची टक्केवारी ७१ टक्के आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १३ हजार २०९ शेतकऱ्यांना ४ हजार ३२ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. या बँकेच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ७८ टक्के आहे. सर्वच बँका मिळून पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ६० टक्के आहे. यावर्षी मृग नक्षत्रास प्रारंभ होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पाऊस पडला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिकाची पेरणी करावी लागली होती. जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आलेल्या संततधार पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला. रोवणीची कामे जोमाने सुरू झाली आहे. निसर्ग कसा साथ देतो, यावरच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट अवलंबून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Crop loan of 73 crores 9 lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.