लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/वैरागड : १५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे. वादळी पावसामुळे वैरागड भागातील १० गावातील वीज पुरवठा गेल्या २४ तासापासून खंडीत झाला आहे.कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून मिरची, मक्का तसेच इतर कडधान्याच्या पिकांची रब्बी हंगामात लागवड करतात. विदभार्तील व्यापारी या परिसरातील मिरची तसेच मक्क्याची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. यामुळे रविवारी राहत असलेल्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो. मात्र शेतकºयांना नगदी उत्पन्न देणारे मक्का आणि मिरचीचे पिक पाऊस व गारपीटीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. सोबतच तूर, हरभरा, जवस, मसूर, उडीद, मूग, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करावे, तहसीलदारांनी प्रत्यक्ष शेतावर येवून पाहणी करावी. तहसीलदार आल्याशिवाय तलाठी कार्यालयात जावून माहिती देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. यामुळे तहसीलदार चव्हाण यांनी मालेवाडा येथे भेट देवून शेतकºयांशी चर्चा केली.यावेळी तहसीलदारांना निवेदन देवून एकरी ४० हजार रुपए नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी शेतीची पाहणी करून सबंधितांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला झालेल्या अवकाळी वादळी पाऊस तसेच गारपिटीमुळे वैरागड भागातील रबी पिकांची हानी झाली. वादळामुळे रस्त्यावर झाडे तुटून वीज तारा तुटल्या. यामुळे गेल्या २४ तासापासून वैरागड भागाच्या १० गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळाच्या तडाख्यामुळे वैरागड-रामाळा मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळली असून या मार्गावरील १० वीज खांब तुटून पडले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वैरागड येथील महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. वादळी पावसाचा देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तिन्ही तालुक्याला तडाखा बसला.
वादळी पाऊस व गारपिटीने रबी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:32 AM
१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे.
ठळक मुद्देझाडे पडून वीज तारा तुटल्या : वैरागड व मालेवाडा भागाला वादळाचा तडाखा