दाेठकुली नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:48+5:302021-05-24T04:35:48+5:30
दाेठकुली नाल्यावर उंच पूल बांधकामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने पावसाळ्यात नागरिकांना ...
दाेठकुली नाल्यावर उंच पूल बांधकामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. मागील वर्षी आलेल्या पुरामुळे या रस्त्यावरची रहदारी तब्बल तीन दिवस बंद होती. सदर मार्गावर अगदी जवळ दोन नाले आहेत. या दोन्ही नाल्यांची उंची कमी आहे. विशेष बाब अशी की, हे दोन्ही नाले खाेलगट भागात असल्याने रस्त्याच्या खालच्या भागात पुराचे पाणी लवकर चढते. भेंडाळा - हरणघाट मार्गावर असलेल्या दोठकुली नाल्यावरूनच गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करता येतो. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नाल्याची उंची प्रशासनाने वाढविण्याची गरज आहे. सदर मार्गावर हा पूल असल्याने दररोज शेकडो नागरिक जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर ये-जा करीत असतात. पावसाळ्यात अडसर निर्माण हाेत असल्याने मागील वर्षीच्या पुरामुळे अनेक लोक जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर अडकले होते. पावसाळ्यात हाेणारी गैरसाेय लक्षात घेता पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.