देसाईगंजात रा. कॉं.तर्फे केंद्र शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:39 AM2021-05-20T04:39:50+5:302021-05-20T04:39:50+5:30
केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ केल्याने प्रतिबॅग ६०० ते ७१५ रुपयांनी खते महाग झाली आहेत. केंद्र ...
केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ केल्याने प्रतिबॅग ६०० ते ७१५ रुपयांनी खते महाग झाली आहेत. केंद्र सरकारचे धाेरण शेतकरीविरोधी आहे, असा आराेप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नाेंदविला. ही दरवाढ मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना प्रदेश संघटन-सचिव युनूस शेख, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, तालुकाध्यक्ष क्षितिज उके, शहराध्यक्ष लतीफ शेख, किशोर तलमले, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, अजय गोरे, भुवन लिल्हारे, राहुल पुस्तोडे, कपिल बोरकर, रोशन शेंडे, भास्कर वाटकर, खुर्शीद शेख, दाऊद शेख, सत्यवान रामटेके, नामदेव वसाके, खालिद शेख उपस्थित होते.