क्षमता विकसित करा

By Admin | Published: August 1, 2014 12:17 AM2014-08-01T00:17:28+5:302014-08-01T00:17:28+5:30

अध्यापन करतांना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.

Develop capability | क्षमता विकसित करा

क्षमता विकसित करा

googlenewsNext

कुरखेडात कार्यशाळा : विनायक इरपाते यांचे प्रतिपादन
कुरखेडा : अध्यापन करतांना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.
स्थानिक गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पर्वावर महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी, मराठी, हिंदी व पाली या विषयांच्या सत्र ५ व ६ च्या अभ्यासक्रमासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन इरपाते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य भैयासाहेब ठाकरे, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.़ डी.व्ही़ नाईक, पदव्युत्तर हिंदी विभागाचे डॉ. प्रमोद शर्मा, गोडंवाना विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे उपस्थीत होते़ याप्रसंगी बी. ए. भाग तीनच्या ‘अक्षरलेणी’ या मराठीच्या व ‘हनीडा’ या इंग्रजीच्या पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनीय भाषणात डॉ. विनायक इरपाते यांनी महाविद्यालयाच्या विकासात प्राचार्य आणि व्यवस्थापन सोबतच प्राध्यापकांची मोलाची भूमिका असते. त्यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन महत्वाचे ठरते असे प्रतिपादन केले़ आणि विद्यापीठांच्या विविध उपक्रमात क्रियाशील असल्याबद्दल महाविद्यालय व प्राचार्यांचे कौतुक केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंडवाना विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी तर संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा़ नरेंद्र आरेकर यांनी केले़ कार्यशाळा दोन सत्रात झाली. कार्यशाळेत विषयनिहाय मराठी व वाङ्मयाच्या अवलोकन सत्रात डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या अध्यक्षतेत डॉ. राजन जयस्वाल आणि डॉ. सुदर्शन दिवसे यांनी मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाची निवड व त्यातून उद्भवलेल्या अनेक प्रश्न सहभागी प्राध्यापक प्रतिनिधींनी मांडले़ इंग्रजीच्या विषयाच्या तांत्रिक सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. एल. व्ही. शेंडे आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. टायटस व डॉ. वरकड यांनी मार्गदर्शन केले. हिन्दी विषयाच्या तांत्रिक सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. कल्पना कावळे आणि मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. प्रभात दुबे मार्गदर्शन केले. कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कला शाखेच्या विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, कला शाखेच्या विविध विषयाचे प्राध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Develop capability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.