काेराेना रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह व उच्चरक्तदाब सर्वांत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:51+5:302021-04-30T04:46:51+5:30

काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार ...

Diabetes and hypertension are the leading causes of death | काेराेना रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह व उच्चरक्तदाब सर्वांत पुढे

काेराेना रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह व उच्चरक्तदाब सर्वांत पुढे

Next

काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तींना हाेत असल्याचे दिसून आले आहे. सद्य:स्थितीत उच्च रक्तदाब व मधुमेह हे अतिशय सामान्य आजार झाले आहेत. शहरी भागातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या बहुतांश नागरिक या आजाराने ग्रस्त राहतात. या आजारांमुळे नागरिक जरी धडधाकट दिसत असला तरी त्याची राेगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे काेराेनासारख्या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून सावरणे कठीण हाेऊन बसते.

गडचिराेली जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात २०० नागरिकांना विविध आजारांची लागण झाली हाेती. त्यात उच्च रक्तदाब असलेले ७८ रुग्ण, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले ५६ रुग्ण, केवळ मधुमेह असलेले २८ रुग्ण, हृदयराेग असेलेले ६, लिव्हर डिसीज असलेले ७, कॅन्सरचे ३, किडनी डिसीज असलेले ४ व इतर राेगांनी ग्रस्त असलेल्या १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

काेणताही आजार नसलेल्या

१८४ जणांचा गेला प्राण

एखादा जुना आजार असेलेल्या व्यक्तीला काेराेनाचा संसर्ग झाल्यास त्या व्यक्तीला सर्वाधिक धाेका राहते. मात्र, काेणताही आजार नसलेेल्या १८४ रुग्णांनाही प्राण गमवावा लागला आहे. हे रुग्ण केवळ काेराेनाने ग्रस्त हाेते. यावरून राेगग्रस्तांसाेबतच सामान्य व्यक्तींनाही काेराेनामुळे धाेका हाेऊ शकतो.

काेराेनाच्या पहिल्या लाटेत मधुमेह व उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांनीही काेराेनाला हरविले हाेते. दुसऱ्या लाटेत मात्र धडधाकट काेराेना रुग्णांनही जीव गमवाला लागत आहे.

एकूण मृत्यू- ३८४

इतर आजारांमुळे मृत्यू- २००

काेराेनामुळे मृत्यू- १८४

Web Title: Diabetes and hypertension are the leading causes of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.