मेळाव्याला उपविभागीय पाेलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार गायकवाड, राजू कळंबे, सुशील जाधव यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित हाेते. मेळाव्यात भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कृषी विषेयक, घरगुती औषध, रासायनिक खते, शेतकरी अपघात विमा याेजना, मानव विकास मिशन याेजना, अहिल्याबाई होळकर योजना, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय व पशुपालन तसेच कृषीविषयक इतर योजनांबाबत मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी प्रास्ताविकातून नागरी कती कार्यक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, तसेच उपस्थित नागरिक, शेतकरी व महिलांना शेती अवजारे, घमेले, चप्पल, रेनकोटसह आवळा, चिंच, सीताफळ, बांबू आदी फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. मेळाव्यात बँक खाते उघडणे, आयुष्यमान भारत कार्ड, पॅनकार्ड काढून वितरित करण्यात आले. शेतीसाठी काटेरी तार, शेळीपालन, घरकुल यांसह विविध योजनांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी मानले.