कार्यक्रमाला पंचायत समितीचे कृषी अधिकारी प.दा. ठाकरे, कृषी सहायक मुद्दमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी ढेमरे, पंचायत समिती सदस्य मालता मडावी, आरोग्य सहायक भजभुजे, पाेलीस उपनिरीक्षक विनय गाेडसे व परिसरातील तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कृषिसेवक, कृषिमित्र व २५० शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये इतर शासकीय याेजनांसह कृषी विभागाच्या याेजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, ६१ लोकांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले, तसेच ८२ शेतकऱ्यांना प्रत्येकी १६ किलोप्रमाणे एकूण १३८० किलो मोफत धान बियाणे व ३० लोकांना प्रत्येकी २ किलो प्रमाणे एकूण ६० किलो मोफत तूर बियाण्यांचे वाटप करण्यात आले. बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत एकूण १८ आदिवासी शेतकऱ्यांना विविध याेजनांतर्गत मंजूर झालेल्या लाभांबाबतचे पत्र कृषी अधिकाऱ्यांनी वाटप केले.
070721\07gad_1_07072021_30.jpg
कृषी मेळाव्यात वितरित केलेल्या बियाण्यांसह शेतकरी व साेबत पाेलीस अधिकारी.