शौचालयात जिल्हा चौथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 01:33 AM2016-06-27T01:33:57+5:302016-06-27T01:33:57+5:30

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात एकूण १३ हजार ५५ वैयक्तिक

District fourth in toilets | शौचालयात जिल्हा चौथा

शौचालयात जिल्हा चौथा

googlenewsNext

नागपूर विभाग : गडचिरोलीत शौचालयाचे झाले ८८ टक्के काम
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात एकूण १३ हजार ५५ वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी ११ हजार ५४१ वैयक्तिक शौचालयाचे काम गावपातळीवर करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामात गडचिरोली जिल्ह्याने नागपूर विभागात चौथा क्रमांक पटकाविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात शौचालयाचे काम ८८.४० टक्के झाले आहे.
शौचालय बांधकामात नागपूर विभागात नागपूर जिल्हा प्रथम, वर्धा द्वितीय, चंद्रपूर तृतीय क्रमांकावर आहे. तर गडचिरोलीनंतर गोंदिया पाचव्या व भंडारा सहाव्या क्रमांकावर आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१५-१६ या वर्षात एकूण १३ हजार ५५ वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तेवढेच शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी ११ हजार ५४१ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. पूर पीडितमुळे काही लाभार्थी इतर गावात स्थलांतरीत झाल्यामुळे तसेच विविध कारणामुळे अद्यापही जिल्ह्यातील १ हजार ५१४ शौचालयाचे काम अपूर्ण आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून एकूण १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. सन २०१५-१६ या वर्षात जि.प. गडचिरोलीतर्फे वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी ५२ गावांची निवड करण्यात आली होती. (स्थानिक प्रतिनिधी)

५० गावांचे प्रस्ताव पाठविणार
४स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात ८० टक्क्याच्या वर वैयक्तिक शौचालयाचे काम झालेल्या ५० गावांचे प्रस्ताव गोदरीमुक्त गाव म्हणून घोषीत होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने येत्या दोन दिवसात राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या संदर्भातील संबंधित ५० ग्रा.पं.चे प्रस्ताव जि.प.कडे सादर करण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू आहे. गोदरीमुक्तीसाठी संबंधित गावात ८० टक्के शौचालय असणे आवश्यक आहे.


चार तालुक्यासह आष्टीत १०० टक्के काम
४स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात भामरागड, धानोरा, कोरची, मुलचेरा या चार तालुक्यात वैयक्तिक शौचालयाचे काम १०० टक्के झाले आहे.
४चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ४०८ वैयक्तिक शौचालयांना अतिरिक्त शौचालय म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. येथे सर्वच शौचालयाचे काम पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी १०० आहे.

Web Title: District fourth in toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.