जयंतीनिमित्त महामानवाला जिल्हाभर अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:14+5:302021-04-16T04:37:14+5:30

आम्रपाली बुद्ध विहार गडचिराेली गडचिराेली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल राेजी महात्मा जाेतिबा फुले ...

District-wide greetings to Mahamanwala on the occasion of his birthday | जयंतीनिमित्त महामानवाला जिल्हाभर अभिवादन

जयंतीनिमित्त महामानवाला जिल्हाभर अभिवादन

googlenewsNext

आम्रपाली बुद्ध विहार गडचिराेली

गडचिराेली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल राेजी महात्मा जाेतिबा फुले वॉर्डातील आम्रपाली बुद्ध विहारात झेंडा वंदन कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नरेश रामटेके यांनी ध्वजाराेहण केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, नगरसेवक प्रशांत खोब्रागडे, गडचिरोली शहराचे पोलीस पाटील अनिल खेवले, सामाजिक कार्यकर्ते राजू दरडे, अमोल खोब्रागडे, स्नेहल मेश्राम, नरेश वाकडे, निखिल वाकडे, मिलिंद खेवले, धम्मदीप वंजारे, भीमराव दरडे, किशोर मेश्राम, भास्कर मेश्राम, श्रवण मेश्राम, मनीषा खेवले, सीमा खोब्रागडे, मनीषा गेडाम, शीला डोंगरे, शेवंता भोयर व वॉर्डातील नागरिक हजर हाेते.

जि.प. उच्च प्राथमिक शाळा नगरी

येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपसभापती राजू नैताम, सदस्य योगेंद्र बारसागडे, सोनू गेडाम, मुख्याध्यापक राजेंद्र घुगरे, शिक्षक नारायण डोनेकर, सचिन कोवे, सुनीता मडावी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय वसा

येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच मुखरू झोडगे, उपसरपंच बाबनवाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष एकनाथ अंबादे, ग्रा.पं. सदस्य अंकुश इंगळे, प्रितेश अंबादे, नानाजी नैताम, मंगला भोयर, वनिता शिवणकर, नेत्रा सेलोटे, मुख्याध्यापक सचिन मडावी, अमरादीप भुरले, गोपाल चापले, महेश निवारे उपस्थित हाेते.

श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती

गडचिरोली : येथे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ गुरुदेवभक्त नत्थूजी चिमूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व अनंता पांदिलवार यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर सर्वांनी विचार प्रकटन केले. याप्रसंगी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.

कार्यक्रमाला नामदेव इजनकर, कुशल काळबांडे, आभास काळबांडे, नाना शर्मा, यामिनी मेडपल्लीवार, प्रीती मुक्तावरम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रचारक प्रवीण मुक्तावरम यांनी केले.

पेरमिली येथे केले अभिवादन

पेरमिली : येथील तक्षशीला बुद्ध विहार व बहुउद्देशीय बुद्ध बाल संस्कार केंद्रात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेरमिलीचे ठाणेदार पंकज सपकाळे हाेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पीएसआय धनंजय पाटील, धवल देशमुख, गंगाधर जाधव, विहाराचे अध्यक्ष शंकर कुंभारे, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ शंकर दुर्गे, देवीदास दहागावकर, सुरेश कोंडागोर्ले, पेरमिलीच्या सरपंच किरण नैताम, महिला कार्यकर्त्या रंजिता मुळावार आदी उपस्थित होते. याप्रसंगी ठाणेदार पंकज सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. याप्रसंगी बौद्ध उपासक, पासिका बालसंस्कार केंद्राचे बालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश कोंडागुर्ले, बकाराम चांदेकर, श्याम दहागावकर, बंडू दहागावकर, प्रज्ञदीप मानकर, अमरदीप मानकर, शुभम दहागावकर यांनी सहकार्य केले.

महागाव (बु.) : येथील बुद्धविहारात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी तथागत विकास मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी तथागत विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. तिरुपती करमे उपस्थित हाेते. यावेळी तिरुपती करमे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. तसेच पुतळ्याचे ध्वजारोहण सरपंच पुष्पा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालय गडचिराेली

येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमाेर दीप प्रज्ज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, सचिव संजय वाळके, रूपेश सावसाकडे, संजय जीवतोडे, अरुण मोहोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा संजीवनी विद्यालय नवेगाव :

येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संजीवनी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. के.चुटे, संजीवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के. भैसारे, व्ही.ए. ठाकरे, आर.डी. यामावार उपस्थित होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस. एडलावार तर आभार टी. डी. मेश्राम यांनी मानले.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव

येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक निवास कोडाप, संजय तुमराम, शारदा कामुनवार, शकुंतला जुमनाके, लीनता सिडाम, फुलाबाई घोडाम उपस्थित होते.

जिल्हा परिषद सेमी इंग्रजी केंद्रशाळा भेंडाळा

येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक नीलेश खोब्रागडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षिका वंदना गुरनुले तसेच पाैर्णिमा साव यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना गडचिरोली

संघटनेतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष याेगेश साेनवाने,

माजी जिल्हाध्यक्ष छगन महाताे, सचिव ऋषी वाल्मीकी, कोषाध्यक्ष विनोद चंडाले, किशोर महातो, शहर अध्यक्ष आशीष समुन्दे, जिला संघटक संजय पंसारे, सहसचिव श्वेता चौहाण, सदस्य रिना महातो, रिता बैरिकर, ममता गाेरे यांच्यासह कामगार उपस्थित हाेते. याप्रसंगी छगन महाताे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.

पंयायत समिती कार्यालय

गडचिराेली : येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी मुकेश मोहर, प्रवीण मुक्तावरम, विस्तार अधिकारी कान्हेकर, नारायण पदा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.

Web Title: District-wide greetings to Mahamanwala on the occasion of his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.