भारतीय संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टिकाेनाचा प्रचार-प्रसार करणे सर्वांचे कर्तव्य आहे. असे असतानाही यावर्षीपासून ज्याेतिषशास्त्र विषयात ज्योतिर्विज्ञानाच्या नावावर ज्याेतिषाचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम सुरू करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. खगोलशास्त्रज्ञ ज्योतिषावर विश्वास ठेवत नाही. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्योतिषांचा कडाडून विराेध केला हाेता. परंतु आता इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाद्वारे अशाप्रकारचा अभ्यासक्रम सुरू केला जात असल्याने युवावर्गाला विज्ञानाकडून प्रकाशाकडे न नेता अज्ञानाच्या सागरात बुडवण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाद्वारे सुरू केल्या जाणाऱ्या ज्याेतिषशास्त्राचा अभ्यासक्रम लागू करू नये, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक जगदीश बद्रे, अध्यक्ष मनाेहर हेपट, काेषाध्यक्ष वासुदेव राेहणकर, जिल्हा युवा अध्यक्ष निवास काेडाप यांनी केली आहे.
ज्याेतिषशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम लागू करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:23 AM