आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका-अशोक नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:39 AM2018-10-03T01:39:49+5:302018-10-03T01:40:13+5:30

माणसाचे आरोग्य सुदृढ व निकोप राहिल्यास आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येते. मात्र आरोग्य बिघडल्यास इच्छाशक्ती प्रबळ असूनही यशाचे शिखर गाठता येत नाही.

Do not ignore health-Ashok Leader | आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका-अशोक नेते

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका-अशोक नेते

Next
ठळक मुद्देविहीरगावात आरोग्य तपासणी शिबिर : शेकडो रूग्णांनी घेतला लाभ, सावंगीत शस्त्रक्रिया होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : माणसाचे आरोग्य सुदृढ व निकोप राहिल्यास आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येते. मात्र आरोग्य बिघडल्यास इच्छाशक्ती प्रबळ असूनही यशाचे शिखर गाठता येत नाही. आरोग्य हिच खरी संपत्ती असल्याने नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
वन विकास महामंडळ व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंतीनिमित्त तालुक्यातील विहिरगाव येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. कृष्णा गजबे, जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, मोतीलाल कुकरेजा, प्रीती शंभरकर, जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, वन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. वाय येटबॉन, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, वडसाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, डॉ. अभूदाय मेघे, डॉ. अभिषेक कुंभरे, डॉ. दिलीप कांबळे तथा एफडीसीएमचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात विहिरगाव परिसरासह तालुक्यातील शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. अशा रूग्णांची यादी निश्चित करण्यात आली असून अशा रूग्णांवर सावंगी येथील दत्ता मेघे रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. एफडीसीएम व विनोबा भावे रूग्णालयाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील रूग्णांना सावंगी (वर्धा) येथे पाठविण्यात येणार आहे.
याप्रसंगी एमडीसीएमचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. कृष्णा गजबे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Do not ignore health-Ashok Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.