डाॅक्टर, आराेग्य कर्मचारीही रक्तदानासाठी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:26 AM2021-07-15T04:26:01+5:302021-07-15T04:26:01+5:30
बाबूजींच्या (जवाहरलालजी दर्डा) प्रतिमेसमाेर दीपप्रज्वलन व पूजन करून जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल रूडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ...
बाबूजींच्या (जवाहरलालजी दर्डा) प्रतिमेसमाेर दीपप्रज्वलन व पूजन करून जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल रूडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, डाॅ.मुकुंद डबाले, डाॅ.शैलजा मैदमवार, डाॅ.अंजली साखरे, सहायक संचालक (कुष्ठराेग) डाॅ.अमित साळवे, लाेकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डाॅ.गणेश जैन आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.बागराज धुर्वे, लाेकमत सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका रश्मी आखाडे, सहसंयाेजिका साेनिया बैस, विकास चाैधरी, प्रज्ज्वल दुर्गे तसेच रुग्णालयाच्या अधिपरिचारिका अंजू यावले, मीरा काेलते, कविता नांदगाये, सुषमा चांदेकर, सुषमा खाेब्रागडे आदींनी सहकार्य केले.
रक्त संकलन करण्याची कार्यवाही रक्तपेढीचे पीआरओ सतीश तडकलावार, विजय पत्तीवार, नरेश कंदीकुरीवार, समता खाेब्रागडे, नीलेश साेनवने, राेहितकुमार पानेमवार, वैशाली खाेब्रागडे, प्रतीक्षा काटेंगे, विवेक घाेनाडे, जीवन गेडाम, वसंत मने, प्रमाेद देशमुख आदींनी पार पाडली.
बाॅक्स ...
रक्तदान ही व्यापक चळवळ व्हावी- डाॅ.रूडे
काेराेना, थॅलेसेमिया, सिकलसेल, रक्ताक्षय यांसारख्या दुर्धर आजाराच्या रुग्णांना व अपघातप्रसंगी माेठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. काेराेना संसर्गानंतर रक्ताची गरज माेठ्या प्रमाणात वाढली आहे. वेळेवर रक्त न मिळाल्यास अनेकांना प्राण गमवावे लागतात. याकरिता रक्तदानाबाबत जनजागृती हाेणे काळाची गरज आहे. लोकमतने सुरू केलेल्या या व्यापक लाेकचळवळीत महाविद्यालयीन युवकांसह सर्व समाज घटकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल रूडे यांनी केले. सामाजिक सद्भावना बळकट हाेण्यास यामुळे चालना मिळणार असून, इथेच न थांबता रुग्णास जीवनदान देणाऱ्या या कार्याला चळवळीचे स्वरूप देण्यासाठी लाेकमतने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बाॅक्स ....
यांनी जाेपासली सामाजिक बांधीलकी
बुधवारी झालेल्या रक्तदान शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जाेपासली. त्यात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल रूडे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डाॅ.सतीशकुमार साेळंके, डाॅ.मुकुंद डबाले, प्रवीण घुटके, पंकज गाेहणे, शंकर ताेगरे, संघदीप वनकर, डाॅ.वंदना पेद्दीवार, आर्विल वडीचार, नागेश तटलावार, डाॅ.स्वाती देशपांडे, स्नेहल संताेषवार, चंद्रशेखर मेश्राम, डाॅ.सुनील मंथनवार, विशाल मांडवगडे, डाॅ. दीनेश राेकडे, केतन वझे, संदीप माेटघरे, संघरक्षीत बांबाेळे, सागर कुकुडकर, आशिष कुनघाडकर, आशिष कुकडे, नरेश मानपल्लीवार, चेतन पेंदाेरकर, मंगेश मुनघाटे, स्वाती महाडाेळे, धीरज धारिया, निखिल बन्साेड, कृष्णा जुमडे, अमित कुंभारे, साेपान म्हशाखेत्री, विठ्ठल साेनटक्के, भंताेष बाला, अमित काेकाेडे, सुरज चांदेकर, आदित्य सरदार, नितीन दानव, राकेश मानपल्लीवार, सुनील घिसे, प्रकाश
पदा
आदींचा समावेश आहे.