क्रियाशिल कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पट बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:00 AM2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:18+5:30
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा अंदाज शासन व आरोग्य विभागाला आला होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने मे, जून महिन्यातच स्वतंत्र कोविड रुग्णालये निर्माण केली. कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. तसेच १० दिवस राहून उपचार घ्यावा लागत असल्याने संबंधित रुग्णाला बेड उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यानुसार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सध्या क्रियाशिल असलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्प्ट बेडची व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत रुग्णालयात भरती होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बेड उपलब्ध होत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा अंदाज शासन व आरोग्य विभागाला आला होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने मे, जून महिन्यातच स्वतंत्र कोविड रुग्णालये निर्माण केली. कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. तसेच १० दिवस राहून उपचार घ्यावा लागत असल्याने संबंधित रुग्णाला बेड उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यानुसार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
उपलब्ध सरकारी दवाखाने तसेच काही शासकीय इमारतींमध्ये बेड व इतर सुविधांची व्यवस्था केली आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हाभरात एकूण १९ शासकीय रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये २ हजार ५५ बेड उपलब्ध आहेत. यातील निम्मे बेड कोरोना रुग्णांसाठी तर निम्मे बेड संशयीत रुग्णांसाठी आरक्षित ठेवले आहेत. सर्वाधिक ३८० बेड जिल्हा रुग्णालय व नर्सिंग कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.
जिल्हाभरातील रूग्णालयांमधील बेड संख्या
रुग्णालय बेड
जिल्हा रुग्णालय १८०
नर्सिंग कॉलेज २००
आलापल्ली पीएचसी ४०
धर्मशाळा, गडचिरोली १००
उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी ३०
उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा २०
आश्रमशाळा, मुलचेरा ६०
आश्रमशाळा, गडचिरोली १५०
वसतिगृह, अहेरी १००
वसतिगृह, भामरागड १५०
वसतिगृह, कुरखेडा १५०
वसतिगृह, देसाईगंज १००
वसतिगृह, एटापल्ली १००
वसतिगृह, कोरची ८५
वसतिगृह, धानोरा १००
वसतिगृह, आरमोरी १४०
वसतिगृह, सिरोंचा १००
वसतिगृह, अहेरी १००
वसतिगृह, चामोर्शी १५०