डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:35 AM2021-04-15T04:35:18+5:302021-04-15T04:35:18+5:30

गुरुदेव सेवा मंडळ रामनगर गडचिरोली : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर गडचिरोली येथील प्रार्थना मंदिरात भारतरत्न डॉ. ...

Dr. Babasaheb Ambedkar's birthday celebrated with enthusiasm all over the district | डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर उत्साहात साजरी

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर उत्साहात साजरी

Next

गुरुदेव सेवा मंडळ रामनगर गडचिरोली : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर गडचिरोली येथील प्रार्थना मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे हे अध्यक्षस्थानी हाेते. यावेळी सहकाेषाध्यक्ष संजय रामगुंडेवार, उपग्रामसेवाधिकारी मधुकर भोयर उपस्थित हाेते. सुरेश मांडवगडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल विविध प्रकारची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार मंडळाचे सचिव कवडूजी येरमे यांनी केले. यावेळी बापूजी गेडाम, रमेश उरकुडे, वामन येरमे, श्रीराम सोनटक्के, पुरुषोत्तम नीलेकार, चंद्रभान गेडाम, जीवन मडावी उपस्थित होते.

गोंडवाना सैनिक विद्यालय

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, शिक्षक कोरे उपस्थित होते. याप्रसंगी सामुदायिक वंदना घेण्यात आली.

सी.आर.पी.एफ. ११३ बटालियन

धानाेरा : सी.आर.पी.एफ. बटालियन कॅम्प धानाेरा येथे १४ एप्रिल राेजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, उप कमांडंट ए. के. अनस, प्रमोद सिरसाठ, सहायक कमांडंट रोहतास कुमार व जवान उपस्थित हाेेते.

कौसल्या निवासी मतिमंद विद्यालय

गडचिरोली : येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जोशी, मानसशास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे, विशेष शिक्षक अरविंद टाकसाळे, तनुजा मोहिते, उमेश देशमुख, वीणा बोधनकर, राजू सुरसे, प्रमोद चिल्वरवार, मंगेश मस्के, किरण निकोडे, रवी जयपूरकर, दिवाकर पिपरे, संभाजी बेदडे, अशोक खेडकर आणि कुंदा म्हस्के आदी कर्मचारी उपस्थित होते.

सम्राट अशोक बुद्ध विहार गांधी वाॅर्ड

देसाईगंज : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष आयु. आनंदराव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी पंचरंगी ध्वजारोहण करतांना समता बौध्द

महिला मंडळाच्या अध्यक्षा आयु. इंदुताई तितरे व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण बौध्द धम्म प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य एम.ए.रामटेके. यांच्या हस्ते झाले. यावेळी दि बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हा प्रवक्ते विजय बन्सोड, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत, सचिव सुरेश मेश्राम, कोषाध्यक्ष ललित खोब्रागडे, सदस्य गौतम लांडगे, गिरीधर मेश्राम, राजविलास गायकवाड, सचिव आशा दहिवले, उपाध्यक्ष निर्मला रामटेके, देवीदास बन्सोड, संतोष ऊके व सुकेसिनी ऊके उपस्थित हाेते. ध्वजारोहणानंतर बुध्दवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन गौतम लांडगे तर आभार राजविलास गायकवाड यांनी मानले.

संविधान बचाव आंदोलन कार्यालय धुंडेशिवणी

गडचिराेली : तालुक्यातील अमिर्झानजीकच्या धुंडेशिवणी येथे संविधान बचाव आंदोलन संस्थेच्या कार्यालयात १४ एप्रिल रोजी सकाळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संविधान बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मेघराज राऊत हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. नामदेव खोब्रागडे, प्रा. नंदकिशोर खोब्रागडे, सविधान बचाव आंदोलनाचे जिल्हा प्रभारी बापूशा ढोणे, रमेश चौधरी उपस्थित होते. यावेळी मेघराज राऊत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.

ग्रामपंचायत वालसरा

चामोर्शी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत वालसरा व छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टाच्या वतीने १४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच अरुण मडावी हाेते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे व प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य कविता कोहळे, ज्योती शेट्टीवार, शालिनी शेट्टे, पाेलीस पाटील भगीरथ भांडेकर उपस्थित होते. बाबासाहेब आणि इतर महामानवांचे विचार जनसामान्यांपर्यत पोहाेचवायचे असतील तर त्यांना जात आणि धर्माच्या चौकटीच्या बाहेर काढावे, असे प्रतिपादन अनुप कोहळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुषमा पेंदाम यांनी केले.

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन

गडचिरोली ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सदानंद ताराम, राजेश्वर पदा, चंद्रकुमार उसेंडी, कुंदनसिंग कोरेटी, सेवक मडावी, अरविंद उसेंडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जयंतीनिमित्त फुले वाॅर्डात ३० जणांचे रक्तदान

गडचिराेली : शहरातील फुले वाॅर्डात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जाेपासली. ह्या शिबिराला जि.प. सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲड. राम मेश्राम, नगरसेवक प्रशांत खाेब्रागडे, राजू चरडे, नरेश वाकडे, विप्लव मेश्राम, पंकज बारसिंगे, आतिश गेडाम, डाॅ. डाेंगरे व आराेग्य कर्मचारी उपस्थित हाेते.

राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

देसाईगंज : येथील राजीव गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष जेसा माेटवाणी हाेते. कार्यक्रमाला ॲड. संजय गुरू उपस्थित हाेते. शिक्षणासह इतर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जेसा माेटवाणी यांनी केले. ॲड. संजय गुरू यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनीत ठेंगरे तर आभार प्रा. अश्पाक सय्यद यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत राऊत, प्रा. वासुदेव नाकाडे, प्रा. सुनील अवसरे, प्रा. संताेष शेंडे, प्रा. पल्लवी मेश्राम, प्रा. पिंकी दाेनाडकर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

माेहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय

देसाईगंज : माेहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य पंकज चाैधरी हाेते. यावेळी प्रा. कृणाल हिवसे, डाॅ. दीप्ती इंगाेले, प्रा. सत्यनारायण पुसाला, प्रा. सुनील चाैधरी, प्रा. प्रवीणकुमार पत्रे, विजय अटाळकर, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.

नगरपंचायत कार्यालय

एटापल्ली : येथील नगरपंचायत कार्यालयात बुधवारी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती जितेंद्र टिकले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रमाेद कपाटे, जगदीश बन्साेड, रमेश येरमे, मधुकर अगुवार उपस्थित हाेते.

आमदार जनसंपर्क कार्यालय

चामाेर्शी : येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आ. डॉ. देवराव होळी यांनी महामानवाला आदरांजली वाहिली. यावेळी चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजपा ज्येष्ठ नेते जयराम चलाख , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी, नीरज रामानुजनवार, रमेश अधिकारी उपस्थित होते. बाबासाहेबांचे जीवन संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरक असून त्यांचे विचार केवळ आत्मसात करून चालणार नाही तर त्यानुसार आपले आचरण देखील करावे लागणार आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार अंगिकारावे, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

बाैद्ध विहारात पंचशील ध्वजाराेहण

अहेरी : येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाच्या वतीने १४ एप्रिल राेजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोने यांनी पंचशील ध्वज फडकविला. त्यानंतर सामूहिक त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलित करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, प्रशांत भिमटे, राहुल गर्गम, माणिक ओंडरे उपस्थित होते.

जयंतीनिमित्त युवक काॅंग्रेसतर्फे रक्तदान

गडचिराेली : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस व अनुसूचित जाती सेल, असंघटित कामगार काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. रक्तदान शिबिराला जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे, असंघटित कामगार अध्यक्ष मिलिंद बागेसर, नंदू वाईलकर, समशेर पठाण, महिला अध्यक्ष भावना वानखेडे, कुसुम आलाम, अर्पणा खेवले, अर्चना जनगणवार, शालिकराम विधाते, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, घनश्याम वाढई, नितेश राठोड, अरुण भादेकर, इम्रान शेख, तोफिक शेख, हेमंत भांडेकर, घनश्याम मुर्वतकर, निनाद डेटेकर, प्रतीक बारसिंगे, सचिन नागोसे, विजय पेटकुले, गौरव येनप्रेद्दीवार, आकाश मडकते, समीर ताजने, मयूर गावतुरे, देवानंद गुरनुले, देवानंद पितराजवार, अशोक राजूरकर, अविनाश ठाकरे, दिवाकर मेकर्तीवारसह काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय

चामोर्शी : येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व रासेयो विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ.डी.जी. म्हशाखेत्री यांची मार्गदर्शनात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. संजय म्हस्के, डाॅ.राजेंद्र झाडे, डाॅ.बी.डब्ल्यू. आंबेकर, डाॅ. आर.डी.बावणे, प्रा. वंदना थुटे, देवाजी धोडरे , रवींद्र कऱ्हाडे, चंद्रकांत राठोड, तुळशीराम जनबंधू उपस्थित होते.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar's birthday celebrated with enthusiasm all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.