अधिकाऱ्यांची उदासीनता व तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाची गती मंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:55+5:30

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आ.डॉ.होळी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्यासह तालुका भूमी अभिलेख, वनविभाग व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहभागी यंत्रणा व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.

Due to the indifference of the officers and technical difficulties, the pace of the house slowed down | अधिकाऱ्यांची उदासीनता व तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाची गती मंद

अधिकाऱ्यांची उदासीनता व तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाची गती मंद

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी : काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्व गरजूंना घरकूल देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. त्यानुसार सदर योजनेची गडचिरोली शहरासह जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अधिकाºयांची उदासीनता व तांत्रिक अडचणीमुळे घरकूल बांधकामाची गती मंदावली असल्याबद्दल, आ.डॉ.देवराव होळी व नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी नाराजी व्यक्त केली. घरकूल योजनेचे काम पुन्हा गतीने सुरू करावे असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आ.डॉ.होळी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्यासह तालुका भूमी अभिलेख, वनविभाग व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहभागी यंत्रणा व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी गडचिरोली पालिकेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकूल योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांनी घरटॅक्स पावती, नमूना आठ, आखीव पत्रिका, रजिस्ट्री आदी दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसे अर्ज सादर करावे, असे या बैठकीत सांगण्यात आाले. सदर बैठकीत घरकूल योजना व इतर विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Due to the indifference of the officers and technical difficulties, the pace of the house slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.