शिक्षकांच्या प्रश्नांवर विमाशिसंने दिले धरणे
By Admin | Published: March 20, 2016 01:08 AM2016-03-20T01:08:33+5:302016-03-20T01:08:33+5:30
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने ...
मागण्यांचे निवेदन सादर : शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर
गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात विमाशीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, माजी प्रांतीय कोषाध्यक्ष शेमदेव चापले, सुरेंद्र मामीडवार, अरविंद बळी, रवींद्र बांबोळे, यादव बानबले, माधव चौधरी, देवेंद्र म्हशाखेत्री शरद निंबोरकर, सुधाकर महाकुळकर, संजय घोटेकर, दिलीप धोडरे, सुनिल देशमुख, नरेंद्र भोयर, एस. एस. दौरेवार, एन. एस. टेकाम, के. एन. रडके, सी. ए. रामटेके, एस. डब्ल्यू. उत्तरवार, अनिल गांगरेड्डीवार, कैलाश भोयर, अतुल येलमुले आदी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री व प्रधानसचिवांना पाठविण्यात आले. या निवेदनात अनुदानासाठी पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान वितरित करावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)