असमतोल पावसाने धान रोवण्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:10 PM2019-07-14T22:10:48+5:302019-07-14T22:11:13+5:30

यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही.

Due to unbalanced rains, there will be delayed rains | असमतोल पावसाने धान रोवण्या लांबल्या

असमतोल पावसाने धान रोवण्या लांबल्या

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रतीक्षा : केवळ पाच टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही. ज्यांचे पऱ्हे रोवण्याजोगे झाले आहेत, आता पावसाने उसंत दिल्याने धानाची रोवणी करणे अशक्य झाले आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के क्षेत्रावरच रोवण्या आटोपल्या आहेत.
यावर्षी पाऊस उशीरा आला. जेव्हापासून पावसाला सुरूवात झाली, तेव्हापासून सातत्याने पाऊस पडत होता. पावसात पेरण्या करणे शक्य होत नाही. सोयाबिन, कापूस, पिकासह धानाचे पऱ्हे टाकण्यासही विलंब झाला. काही शेतकऱ्यांनी तर अजूनपर्यंत पऱ्हेच टाकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता जून महिन्यातच धानाचे पऱ्हे टाकले. त्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होताच रोवणीच्या कामाला सुरूवात केली. मोठ्या प्रमाणात मजूर मिळत असल्याने त्यांची रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे टाकण्यास विलंब झाला. सतत पाऊस पडत असतानाही काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांचे पऱ्हे आता रोवणीजोगे झाले आहेत. मात्र पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. जोपर्यंत मोठा पाऊस येणार नाही, तोपर्यंत धानाची रोवणी सुरू होणार नाही.
मागील वर्षी वेळेत पाऊस पडला होता. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकणे व रोवण्याची कामे अगदी वेळेत सुरू झाली होती. मागील वर्षी जुलै महिन्यातच रोवण्यांना सुरूवात झाली होती. वेळेवर रोवण्या झाल्याने उत्पादनही चांगले झाले होते. यावर्षी मात्र रोवणी लांबणार असल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेवटी पाऊस न पडल्यास धान पीक करपण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी कमी व मध्यम कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे.

आवत्या पद्धतीने धान लागवडीवर भर
आवत्या पध्दतीने धानाची लागवड केल्यास उत्पादन कमी होते. मात्र उत्पादन खर्च सुध्दा कमी आहे. यावर्षी पाऊस विलंबाने पडला. त्यामुळे रोवण्या लांबल्या आहेत. धान परिपक्व होण्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेले धानपीक करपल्यास शेतकऱ्याचे पूर्ण उत्पन्न बुडते. उलट तोट्याचा सामना करावा लागतो. याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी आवत्या पध्दतीने धान लागवड करण्यास विशेष भर दिला आहे. विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात आवत्या टाकले आहेत.

जलसाठे कोरडेच
अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव व इतर जलसाठे अजुनही कोरडेच आहेत. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची भिती आहे. विहिरींनाही अजूनपर्यंत पुरेसे पाणी आले नाही.

Web Title: Due to unbalanced rains, there will be delayed rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.