शिक्षण आयुक्तांनी जाणल्या समस्या
By admin | Published: March 18, 2016 01:31 AM2016-03-18T01:31:01+5:302016-03-18T01:31:01+5:30
राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी बुधवारी सायंकाळी तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला
इंदारामला भेट : विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांशी संवाद
अहेरी : राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी बुधवारी सायंकाळी तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन येथील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान शाळा परिसराची पाहणी करीत समस्याही जाणून घेतल्या.
भेटीदरम्यान शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींशी मुक्तपणे संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. दरम्यान बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी घेत असलेल्या कराटे प्रशिक्षण, रोप मल्लखांब नैपुण्य प्रशिक्षण तसेच साहित्य प्रदर्शनीचीही पाहणी केली. शाळेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची डॉ. भापकर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
यावेळी अधिकारी तोरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (निरंतर) नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी राऊत, अहेरीचे गटशिक्षणाधिकारी विक्रम गिरे, मुख्याध्यापक डी. वाय. ढवस उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)