गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंजमध्ये पोलिसांचा प्रभावी रुटमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:44 PM2020-04-10T20:44:43+5:302020-04-10T20:45:07+5:30
देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्याचे संकेत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्याचे संकेत दिले. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
देसाईगंज शहराची आजमितीस 55 हजार लोकसंख्या आहे. शहरात जमावबंदी व संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असताना काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून येत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा संभाव्य संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता तालुका प्रशासन लागु करण्यात आलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरसावले असुन देसाईगंज पोलिसांनी या कामी देसाईगंज शहराच्या भगतसिंग वार्ड, आंबेडकर वार्ड, कन्नमवार वार्ड, सिंधी कॉलनी, कमलानगर, गांधी वार्ड,बुरड मोहल्ला,राजेंद्र वार्डासह शहराच्या मुख्य मार्गांने रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.