छत्तीसगड-तेलंगणातील निवडणूक; सीमावर्ती भागात पोलीस सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:46 PM2018-10-30T17:46:28+5:302018-10-30T17:46:56+5:30

नक्षलग्रस्त छत्तीसगड आणि तेलंगणात येत्या महिनाभरानंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या हद्दीतही पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढविला आहे.

Elections in Chhattisgarh-Telangana; Police alert in the border areas | छत्तीसगड-तेलंगणातील निवडणूक; सीमावर्ती भागात पोलीस सतर्क

छत्तीसगड-तेलंगणातील निवडणूक; सीमावर्ती भागात पोलीस सतर्क

Next
ठळक मुद्देनक्षली कारवाया रोखणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त छत्तीसगड आणि तेलंगणात येत्या महिनाभरानंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या हद्दीतही पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढविला आहे. निवडणुकीसारख्या लोकशाही प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दोन्ही राज्यात त्यांच्या कोणत्याही घातपाती कारवाया यशस्वी होऊ नये यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दल नक्षलींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
याच आठवड्यात नागपूरमध्ये तीनही राज्यांच्या पोलीस दलांचे अधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर सीमावर्ती भागात पोलीस दल अधिक सक्रिय झाले. छत्तीसगड किंवा तेलंगणात कारवाया करून नक्षलवादी गडचिरोलीच्या हद्दीतील जंगलात आश्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत यासाठी पोलीस दल प्रयत्नशिल आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात छत्तीसगड आणि तेलंगणात विधानसभेची निवडणूक होत आहे. तेलंगणात नक्षलींचे अस्तित्व पूर्वीपेक्षा बरेच कमी झाले असले छत्तीसगड राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये नक्षलींचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सीमावर्ती भागात नक्षलींच्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

Web Title: Elections in Chhattisgarh-Telangana; Police alert in the border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.