लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालसकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा सूचना अधिकारी एस. आर. टेंभुर्णे, नियोजन अधिकारी सागर पाटील, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, जिल्हा नाझर डी. ए. ठाकरे, अधीक्षक किशोर भांडारवार आदी उपस्थित होते.संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आंबेडकरवादी विचारमंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळा, महाविद्यालयातून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी संविधानाबाबत जनजागृतीपर घोषणा दिल्या. शहरातील मुख्य मार्गाने रॅली फिरविण्यात आली. त्यानंतर विश्रामगृहातच रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कर्मचाऱ्यांनी केले संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 6:00 AM
संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आंबेडकरवादी विचारमंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळा, महाविद्यालयातून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम : गांधी चौकातून काढली रॅली