लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना शनिवारी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. अचानक भेटीने कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली.लाहेरी येथील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आरोग्य वर्धिनी केंद्रालाही भेट दिली. होडरी या गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी जास्त व वर्गखोली कमी असल्याने पावसाळा संपताच नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. भामरागड तालुक्यातील मॉडेल स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर देवराई आॅर्ट व्हिलेजला भेट दिली. ग्रामीण रूग्णालय भामरागड येथील प्रसुती गृहाचे लोकार्पण केले. नगर पंचायत व पंचायत समितीच्या कामांचा आढावा घेतला. वनहक्क पट्टे दावे त्वरीत निकाली काढण्याचे आश्वासन दिले. विविध विकासकामांवर कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. ताडगाव येथील बँक आॅफ महाराष्टÑचे लोकार्पण केले. जात प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. दौºयादरम्यान तहसीलदार कैलास अंडील, बीडीओ महेश ढोके, बीईओ अश्विनी सोनावने, नायब तहसीलदार निखील सोनावने, टीएचओ डॉ.मिलिंद मेश्राम, सभापती सुखराम मडावी, डॉ.संगीता गाडगे हजर होते.जिल्हाधिकाºयांच्या भेटीने दुर्गम भागातील जनता नगर पंचायत, पंचायत समितीचे पदाधिकारी सुखावले आहेत. जिल्हाधिकाºयांनी दिलेली आश्वासने पूर्ण होतील, असा विश्वास नागरिकांना आहे. वेतनापुरता काम करणारे कर्मचाºयांमध्ये जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानंतर काही फरक पडेल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:13 PM
जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना शनिवारी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. अचानक भेटीने कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली.
ठळक मुद्देअनेक विकासकामांचे लोकार्पण । नगर पंचायत व पंचायत समितीचा आढावा