वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा; एक दिवसापासून हाेता बेपत्ता

By गेापाल लाजुरकर | Published: June 9, 2023 06:55 PM2023-06-09T18:55:19+5:302023-06-09T18:55:38+5:30

बालकदास लव्हाजी अंबादे (वय,५४) रा. कुंभीटाेला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

farmer ended his journey by hanging himself from a banyan tree He has been missing for a day | वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा; एक दिवसापासून हाेता बेपत्ता

वडाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा; एक दिवसापासून हाेता बेपत्ता

googlenewsNext

गडचिराेली : आदल्या दिवसापासून घरून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शुक्रवार ९ जून राेजी गावालगतच्या नदीकाठावरील वडाच्या झाडाला स्वत:च्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील कुंभीटाेला येथे दुपारी १२ वाजता उघडकीस आली. बालकदास लव्हाजी अंबादे (वय,५४) रा. कुंभीटाेला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी बालकदास अंबादे हे गुरूवारी सकाळी ११ वाजता घरून बाहेर पडले. सायंकाळ व रात्र हाेऊनही ते घरी परतले नाही. तेव्हा कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला. परंतु ते सापडले नाही. दरम्यान शुक्रवारी दुपारी शेळ्या चारणाऱ्या एका इसमाला सती नदीलगतच्या वडाच्या झाडाला मृतदेह लाेंबकळत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी गावात माहिती दिली. तेव्हा अंबादे यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. बालकदास यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच कुरखेडाच्या पाेलिस उपनिरीक्षक शीतल माने यांनी घटनास्थळावर पाेहाेचून पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता मृतदेह पाठविला. सदर घटनेबाबत कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील आहेत.

तीन महिन्यांत दुसरी घटना
नापिकीला कंटाळून कुंभीटाेला येथील एका शेतकऱ्यांने यावर्षी मार्च महिन्यात आत्महत्या केली हाेती. सदर घटनेमुळे तालुक्यात आंदाेलन उभे राहिले हाेते. त्यानंतर आता पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ह्या घटनेचा शाेध घेणे आवश्यक आहे.

Web Title: farmer ended his journey by hanging himself from a banyan tree He has been missing for a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.