शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
6
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
7
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
8
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
9
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
10
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
11
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
12
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
13
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
14
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
15
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
16
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
17
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
18
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
19
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
20
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांचा घात

By admin | Published: March 10, 2016 2:32 AM

महाराष्ट्र शासनाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नर्स सुविधा सुरु करून सर्व प्रशासकीय बाबी आॅनलाईन सुरु केल्या आहेत.

संकटे संपेना : शेतकऱ्यांची मुले शिकूनही बेरोजगारसासरा : महाराष्ट्र शासनाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नर्स सुविधा सुरु करून सर्व प्रशासकीय बाबी आॅनलाईन सुरु केल्या आहेत. राज्यात खेड्यापाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुले ग्रामपंचायत कार्यालयात तसेच इतर कार्यालयात डाटा आॅपरेटर म्हणून काम करत आहेत. त्यांना कायमस्वरुपी नोकरी देण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढून नियमित करू, असे आश्वासन विधीमंडळ अधिवेशनात दिले होते. त्या अनुषंगाने अद्यापही काहीच हालचाल होत नसल्याचे दिसताच भावी आयुष्याचे चित्र रंगवित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचे बेहाल होत असल्याचे चित्र आहे.यापूर्वीच्या सरकारने ए.पी.एल. कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून राशन पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून गरीब शेतकऱ्यांचे हित जोपासले होते. ते मिळणारे धान्य सद्याच्या सरकारने बंद केले आहे. नापिकी, दुष्काळी आदी कारणाने धान्याचे अत्यल्प उत्पान होऊ लागले. परिणामी उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे धान्य कोठून आणावे? मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या कशा सोडवाव्यात? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. अच्छे दिनांच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांचा घात होत आहे.यापूर्वी महाराष्ट्रातील नागरिक चुलीवर स्वयंपाक करत होते. त्यासाठी इंधन म्हणून लाकडांंचा उपयोग करत होते. अलिकडे वृक्षांचा तुटवडा पडला आहे. वृक्षतोडीवर बंदी आहे. बदलत्या युगात नवनवीन संशोधने लागली आहेत. नवीन सोई सुविधा स्वीकारल्या जात आहेत. चुलीवरच्या स्वयंपाकाला फाटा दिल्या गेल्याने सिलेंडर गॅस सुविधा विकसीत झाली. बदलत्या काळातील बदलत्या सोई सुविधा सहर्ष स्वीकारण्यात येऊ लागल्या. ज्यांचेकडे स्वयंपाकासाठी गॅस सुविधा आहे. अशांना रॉकेल विक्री केंद्रातून राशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. असा फतवा काढण्यात आला. गॅस सुविधेने स्वयंपाक करता येतो. पण वीज खंडीत झाल्यास घरात प्रकाशासाठी उपयोग करता येत नाही. एखाद्या कुटुंबाने काटकसर तसेच पदरमोड करून पैसे संचयित केले. परिवर्तन काळाची गरज आहे. हे ओळखून गॅस कनेक्शन विकत घेतला. एखाद्याने काटकसर करून, अर्धपोटी उपाशी राहून गॅस कनेक्शन घेतला. म्हणजे तो श्रीमंत गर्भश्रीमंत झाला असे समजणे संयुक्तीक वाटत नाही. कुठेतरी शासन, गरीब जनतेवर अन्याय करत आहे हे सिद्ध होत आहे. तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे राहिले अशी अवस्था आहे.तांत्रिक बिघाडाने, नैसर्गिक आपत्तीने जेव्हा विद्युत खंडीत होते. तेव्हा घरात प्रकाश पुरविण्यासाठी रॉकेलची गरज असते. म्हणून एपीएल, बीपीएल, अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य घेणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्डधारकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा अशी शेतकरी, शेतमजूर पालकांनी मागणी केली आहे. वित्तीय वर्षात डाटा आॅपरेटर्सना आपापल्या कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. डाटा आॅपरेटर्सना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे. (वार्ताहर)