बंगाली समाजाच्या मागण्यांसाठी लढा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:47 PM2018-12-30T23:47:08+5:302018-12-30T23:48:00+5:30
मागील अनेक वर्षांपासून बंगाली बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, बंगाली समाजाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही, अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : मागील अनेक वर्षांपासून बंगाली बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, बंगाली समाजाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही, अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही. या सर्व प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवून बंगाली समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे ३० डिसेंबर रोजी आयोजित बंगाली समाज मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. सह उद्घाटक म्हणून आमदार डा.ॅ देवरावजी होळी, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, बंगाली समितीचे प्रदेश अध्यक्ष दिपक हलदर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भाजपा बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा होते.
प्रमुख अतिथी म्हणून पं.स.च्या उपसभापती आकुली बिश्वास, मूलचेरा पं स चे उपसभापती बासू मुजुमदार, सुभाषग्रामचे सरपंच सतीश रॉय, जि. प. सदस्य शिल्पा रॉय, भाजपचे जिल्हा सचिव बिधान व्यापारी, सुभाष गणपती, प्राचार्य मंडल, प्राचार्य खराती, राजीव शहा, बादल शहा, दुगार्पूरच्या सरपंच प्रतिभा सरकार, नेताजीनगरच्या सरपंच अनिता रॉय, पं स सदस्य प्रीती बिश्वास, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, मूलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, बंगाली आघाडीचे तालुकाध्यक्ष बिधान वैद्य, तालुका महामंत्री अशोक बडाल, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर , दुलाल मंडल व बंगाली आघाडी चे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर व आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.