कायद्याचे भान असल्याशिवाय अत्याचाराविरुद्धचा लढा अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:27+5:302021-04-30T04:46:27+5:30
त्या स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ...
त्या स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला सुरक्षेवर आयोजित ऑनलाईन प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकात डोर्लीकर होते. यावेळी महिला राज आणि महिला सक्षमीकरण समितीच्या पदाधिकारी प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. सीमा नागदेवे व प्रा. स्नेहा मोहुर्ले सहभागी होत्या.
याप्रसंगी नर्गिस पठाण यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे दाखले देताना हुंडाबळी, बलात्कार, छळ, सातत्याने दिली जाणारी अपमानास्पद वागणूक अशा स्त्री अत्याचाराचे स्वरूप सांगितले व या अत्याचाराविरोधात असणाऱ्या कायद्यांची माहिती दिली. त्यांनी भारतीय संविधान अंतर्गत असलेल्या अधिकारांची आणि कर्तव्याची माहिती सहभागी विद्यार्थिनींना आणि प्रतिनिधींना दिली. कलम १४, कलम ३५४, कलम ३७६, ४९८ अशा कलमांची माहिती देऊन स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात वाचा फोडण्याचे आणि न्यायाचे हे प्रमुख शस्त्र असल्याचे सांगितले. उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी महिलांनी अत्याचाराविरोधात आवाज उठवावा व त्यासाठी न्यायालयीन लढा देण्यास मागे पुढे पाहू नये त्याशिवाय पीडितेला न्याय मिळणे कठीण आहे असे स्पष्ट केले. यावेळी नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती दीपांजली गावीत, जीपनेर पॉंडिचेरी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पाैर्णिमा चहांदे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा. सुनंदा कुमरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सीमा नागदेवे यांनी केला तर आभार प्रा. स्नेहा मोहुर्ले यांनी मानले. तंत्र सहाय्य प्रा. सुनील चुटे, प्रशांत दडमल यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर कुथे, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.