गडचिरोली जिल्हा उद्योगविरहित असून शेती हाच प्रमुख व मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यातील 'वडसा रॅक' पॉइंटवर युरिया पाहिजे त्या प्रमाणात उतरवीत नसल्याने जिल्ह्यात युरियाची मोठी टंचाई व तुटवडा होत आहे. याकडे केंद्राचे कृषी तथा किसान कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यात युरियाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्राधान्याने लक्ष देण्याकडेही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रसिद्धीपत्रकात लक्ष वेधले आहे. शेतीसाठी लागणारी साहित्यसामग्री वेळेवर उपलब्ध झाली तर शेतात भरघोस पिके व उत्पादन घेता येते. दरवर्षी युरिया व रासायनिक खतांची टंचाई भासत असते; त्यामुळे शेतकऱ्यांना निराश व्हावे लागते. युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा होऊ देऊ नये व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रँक पॉइंटवर अधिक प्रमाणात युरिया उतरविण्यात यावा. तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकातून दिला आहे.
120721\4045img-20210712-wa0019.jpg
बाबा