गडचिरोली येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा मुबलक प्रमाणात असूनदेखील कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णालयामध्ये इंजेक्शनचा वापर योग्यप्रकारे केला जात आहे किंवा नाही याचाही शोध घेणे आवश्यक झाले आहे. तसेच आतापर्यंत किती इंजेक्शन चोरीला गेले याचीही चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात उपलब्ध इंजेक्शनचा साठा किती आहे, याचीही दैनिक माहिती दिली जावी. तसेच आतापर्यंत किती रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले व त्याची दैनंदिन नोंद रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली का याबाबतची देखील चौकशी करण्यात यावी. तसेच इतर जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा असताना बाहेर जिल्ह्यातील रुग्ण गडचिरोलीत येत आहेत आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणे अशक्य झाले आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला प्राधान्याने आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणीदेखील वासेकर यांनी केली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनच्या चोरीमागील खरा सूत्रधार शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:46 AM