पहिल्याच दिवशी भाडभिडी शाळेला ठाेकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:57+5:302021-06-29T04:24:57+5:30
भाडभिडी माेकासा येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत सद्य:स्थितीत ६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेवर एकूण ...
भाडभिडी माेकासा येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत सद्य:स्थितीत ६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेवर एकूण चार शिक्षक मंजूर आहेत. मात्र, दीड वर्षापूर्वीपासून या ठिकाणी आता दाेनच शिक्षक कार्यरत आहेत. यात एक मुख्याध्यापक व वर्ग ५ ते ७ चे दुसरे शिक्षक आहेत.
पूर्वीच्या शिक्षकांमधील वर्ग १ ते ५ वी च्या शिक्षिका विना तराडे या जानेवारी २०२० पासून मेडिकलवर होत्या. ८ जुलै २०२० ला त्या मृत्यू पावल्या. दुसरे शिक्षक विवेक रामटेके यांची १९ नोव्हेंबर २०२० रोजी चंद्रपूर जिल्ह्यात बदली झाली. तेव्हापासून दाेन्ही पद भरली नाहीत. परिणामी १ ते ५ वर्गासाठी एकही शिक्षक नाही. वारंवार मागणी करूनही पदभरतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सात वर्ग दाेनच शिक्षक कसे सांभाळणार असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. त्यातही एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा प्रभार असल्याने अध्यापनाबराेबरच त्यांना प्रशासकीय कामेही सांभाळावी लागणार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शाळा समिती सदस्य व ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठाेकले. जोपर्यंत रिक्त शिक्षक पदे भरणार नाही तोपर्यंत शादा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.