चारचाकी वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:45+5:302021-07-08T04:24:45+5:30

चामोशी परिसरात माेठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते. त्यामुळे बाहेरून अवैध दारूचा पुरवठा केला जाताे. फाेकुर्डी येथे चारचाकी ...

Five and a half lakh items including four-wheeler seized | चारचाकी वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

चारचाकी वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

चामोशी परिसरात माेठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते. त्यामुळे बाहेरून अवैध दारूचा पुरवठा केला जाताे. फाेकुर्डी येथे चारचाकी वाहनाने अवैध दारूची वाहतूक हाेत असल्याच्या माहितीवरून चामोशी परिसरात अवैध दारू पकडण्याची कारवाई करण्याकरिता दोन स्थानिक पंचांना सोबत घेऊन गस्त लावली लावण्यात आली. याच वेळी चामोर्शी मार्गाने भेंडाळाकडे सफेद रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. एस.एच.३३-ए-१७२० असा त्या चारचाकी वाहनाचा क्रमांक हाेता. पाेलिसांनी रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करून सदर वाहनाला थांबविले व वाहनाची तपासणी केली असता तेथे अवैध देशी दारूचा साठा मिळून आला. सुपर साॅनिक रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० मि.ली. मापाचे एकूण ४६ नग सीलचंद बाॅक्स दिसले. यातील प्रति बॉक्समध्ये १०० सीलबंद निपा अशा एकूण ४ हजार ६०० सीलबंद निपा आढळून आल्या. सदर दारूची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार रुपये आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाची किंमत २ लाख रुपये आहे. अवैध दारू व चारचाकी वाहनासह एकूण ५ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून व ताब्यात घेऊन चामाेर्शी पाेलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी आराेपी साेमेश्वर बालाजी गाेहणे रा. फाेकुर्डी याच्यावर चामाेर्शी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Five and a half lakh items including four-wheeler seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.