मुलचेरा तालुक्याच्या विकासासाठी पाठपुरावा
By admin | Published: October 10, 2016 12:54 AM2016-10-10T00:54:47+5:302016-10-10T00:54:47+5:30
मुलचेरा तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेला तालुका आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तालुक्याचा विकास रखडला आहे.
समस्या जाणल्या : धर्मरावबाबा आत्राम यांची माहिती
मुलचेरा : मुलचेरा तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेला तालुका आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तालुक्याचा विकास रखडला आहे. येथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाकडे आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
मुलचेरा तालुक्यातील गीताई सार्वजनिक दुर्गा मंडळ विवेकानंदपूर तसेच देशबंधूग्राम येथील दुर्गा मंडळांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांसोबत धर्मरावबाबा आत्राम यांनी चर्चा केली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, रायुकाँ तालुका अध्यक्ष युद्धिष्ठीर बिश्वास, प्राचार्य लतीफ शेख, शहर अध्यक्ष टिल्लू मुखर्जी, जहर हलदार, नगराध्यक्ष सुभाष आत्राम, नगरसेवक चापले, विष्णू रॉय, बिधान रॉय, अप्पू मुजूमदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. विवेकानंदपूर व देशबंधू ग्राम येथील नागरिकांनी धर्मरावबाबा आत्राम, प्रशांत कुत्तरमारे व बबलू हकीम यांचा सत्कार केला.